Eknath Shinde Shivsena: सोशल मिडीयावर सुरू असलेल्या भाजप शिवसेनेच्या नेत्यांमधील कोल्ड वॉर दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र धंगेकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधक आणि शिक्षक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, तेव्हापासून महायुतीमधील अंतर्गत संघर्ष समोर येऊ लागला आहे. खासकरुन एकनाथ शिंदे शिवसेना (Eknath Shinde) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.