Prakash Abitkar : आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी ‘आरोग्य जनसंवाद यात्रा’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रेचा’ आज 1 नोव्हेंबर रोजी नांदेड येथून शुभारंभ होत आहे.