पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कपड्याच्या दुकानात ही घटना घडल्याचा आरोप आहे. वसई : नालासोपाऱ्यात (Nalasopara) 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. अमन नातिफ शेख (वय 24 ) आणि अरबाज शेख (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.