पिंपरी, ता. ३१ ः दिवाळीच्या खरेदीसाठी पिंपरी कॅम्प येथील बाजारपेठेत गर्दी हळूहळू वाढत असताना वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्याचे लालबहादूर शास्त्री भाजी मंडईलगतचे वाहनतळ अपुरे पडत असल्याने बाजारात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे. अन्यथा रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतूककोंडीत भर पडण्याची शक्यता आहे.पिंपरी कॅम्पमधील शगुन चौक, साई चौक आणि मुख्य बाजारपेठ परिसरात कपडे, सजावटीचे साहित्य व पूजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक येतात.