दूरसंचार विभाग अन् सीबीआयचा खाकी वर्दीत व्हिडिओ कॉल; आरबीआयच्या बनावट पत्राने लातूरच्या वृद्धाला लुटले, उदगीरमध्ये गुन्हा दाखल. लातूर ) : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवत एका ६९ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाची ७ लाख ५० हजार ४७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल २० दिवस त्यांच्यावर व्हिडिओ कॉलद्वारे नजर ठेवण्यात आली.