संदीप भोसले, लातूर | साम टीव्हीलातूरमधील उमाटे कुरिअरच्या ठिकाणी कुरिअर घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये मोठा स्फोट झाला. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झालीय. स्फोटाची. स्फोटाची तीव्रता पाहून घटनास्थळी तात्काळ फॉरेन्सिक पथक आणि दहशतवादी विरोधी पथक दाखल झाले. पोलीस प्रशासनाकडून या स्फोटाचं नेमकं कारण शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय. स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक, फॉरेन्सिक लॅब, दहशतवादविरोधी पथक, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.