कुरिअरच्या बॉक्समध्ये नेमकं काय होतं? पार्सल उचलताच मोठा स्फोट; लातूरमध्ये उद्योग भवन परिसरात प्रचंड खळबळ. -रामेश्वर भंडारे लातूर : लातूर शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या समांतर रस्त्यावरील उद्योग भवन परिसरात शनिवारी सकाळी एका खाजगी कुरिअर कंपनीच्या वाहनातून पार्सल उतरवत असताना अचानक झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण शहर हादरले आहे. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या अनपेक्षित दुर्घटनेत कुरिअर कंपनीचा एक कर्मचारी गंभीररीत्या भाजून जखमी झाला आहे.