छत्रपती संभाजीनगर: शहरातील सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण असलेल्या सिद्धार्थ या १७ वर्षीय वाघाचा गुरुवारी (२९) रात्री ९ वाजता मृत्यू झाला. याच प्र. याच प्राणिसंग्रहालयात जन्मलेल्या सिद्धार्थने आपले संपूर्ण आयुष्य याच ठिकाणी व्यतीत केले. गेल्या १७ वर्षांपासून पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या या वाघाच्या मृत्यूने प्राणिसंग्रहालयातील एक महत्त्वाचे आकर्षण हरपले..सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणिसंग्रहालयातील वाघांचे सरासरी आयुर्मान १६ ते १८ वर्षे असते. सिद्धार्थचे वय १७ वर्षे झाले होते.