अटक चौघांपैकी तिघांचे पासपोर्ट पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यातील दोघांचा व्हिसा संपल्याचे समोर आले. लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंब्र्यातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करीत टांझानियाच्या चार नागरिकांना अटक केली. सम्राटनगर येथील हरीओम इमारतीत छापा टाकून पोलिसांनी तब्बल एक कोटी ५० लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या कारवाईत मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आणि अन्य साहित्यही हस्तगत करण्यात आले.