पालघर: देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत असले, तरी मुंबई आणि ठाणेकरांना या वेगवान प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा कराव. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी १५ ऑगस्ट २०२७ पासून देशातील पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे. सुरुवातीला ही सेवा गुजरातमधील सुरत ते बिलिमोरा या मर्यादित टप्प्यावर धावणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मार्गाचा विस्तार केला जाणार असून, मुंबई-अहमदाबाद मार्ग २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे संकेत रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत.