India-Israel इस्त्रायली धर्मगुरुचं हिंदूवर संतापजनक वक्तव्य केलं आहे. भारतीय गायीचे मूत्र पितात आणि चाटतात, असं विधान त्यांनी केलं. हिंदू धर्मीयांच्या श्रद्धा आणि गोपूजेविषयी एका इस्त्रायली गुरूने वादग्रस्त टिप्पणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. हिंदू धर्मावरील विधानाने इस्त्रायली-अमेरिकेचे रब्बी योजी मिझराही वादात सापडले आहेत. त्यांचं हिंदू धर्मावरील वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून भारतीय आणि इस्त्रायली नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे. या व्हिडिओतून त्यांनी हिंदू धर्मीय करत असलेल्या गोपूजेची खिल्ली उडवली आहे.