IND vs NZ Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका सुरु असून चौथा सामना भारतीय संघाला गमवावा लागला. आता भारतीय संघाच्या पराभवामागे सामन्यातील सातवी ओव्हर असल्याचे म्हटले जात आहे. सलग तीन टी२० सामने जिंकल्यानंतर ईडेन पार्कवर टीम इंडियाला चौथ्या टी२० सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा ८७ धावांनी चौथ्या टी-२० मध्ये पराभव झाला. पण भारतीय संघाने एवढ्या मोठा फरकाने सामना गमावण्यामागे एक कारण समोर आले आहे.