वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. घरास घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातून वाल्मिक कराडच्या मुलाचं धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, पोक्सो कलम, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 14 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.