सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर आज बंद असले तरी, अधिकृत पासधारकांसाठी विशेष व्यवस्था आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आज सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.