सातारा : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दीपोत्सवाचा प्रारंभ दि. ६ नोव्हेंबर रोजी गोवत्सपूजनाने होणार आहे. त्यामुळे अवघ्या जनजीवनाला दीपोत्सवाची आतुरता वाढली आहे. दिवाळीनिमित्त नवीन वास्तू, वस्तू, वाहन खरेदीचा शुभमुहूर्त साधणार असल्याने बाजारपेठेचा आढावा घेण्यासाठी धांदल उडाली आहे. त्यामुळे सातारा शहर व परिसरातील रस्ते गर्दीने फुलू लागले आहेत. सजावट, इलेक्ट्रीक वस्तू, कपडे, भुसार मालासह सर्वत्रच होणार्या आर्थिक उलाढालीमुळे व्यावसायिक झळाळी येवू लागली आहे. पुढील काही दिवसांमध्ये ही झळाळी आणखी वाढणार आहे..