उंडाळे : राज्यभरात उसाच्या दरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले असतानाच कराड दक्षिण विभागातही ऊसदर आंदोलनाची धग वाढू लागली आहे. प्रतिटन पाच हजार रुप. प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने आज सकाळी दहा वाजल्यापासून ओंड-उंडाळे दरम्यान आंदोलन छेडण्यात आले. यावेळी उसाने भरलेली अनेक वाहने रोखून धरत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने कारखानदारांचे लक्ष वेधले..