सांगली : अभयनगर येथील सांगली मेटल स्क्रॅप मर्चंट कंपनीच्या आवारात ट्रक पाठीमागे घेत असताना घडलेल्या भीषण अपघातात एका परप्रांतीय कामगाराचा जागीच चिरडून मृत्यू झ. वीरेंद्र सुखदेव निशाद (वय ४५, मूळ रा. कुपवाड) असे मृत मजुराचे नाव आहे..मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चालक शोएब शकील मगदूम (वय २८, रा. सबीना कॉम्प्लेक्स, सांगली) हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच १२ एल ९४५६) पाठीमागे घेत होता.