साखरवाडी : फलटण-लोणंद पालखी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून, हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्व. दोन दिवसांपूर्वी निंभोरे गावच्या हद्दीत उसाच्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. २९) सुरवडी गावच्या हद्दीत गोल्डन सिटी सहकारी सोसायटीसमोर दुचाकीच्या धडकेत ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला..कृष्णाबाई उत्तमराव धनवडे (वय ७५, रा.