सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदारांवर मोठ्या प्रमाणात आर्थि. या निवडणुकीत मतदारांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजकीय रसद खर्च करूनही उमेदवारांमध्ये परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांकडून दगाफटका होऊ नये आणि त्यांनी कोणाला मतदान केले, याची खात्री करता यावी, यासाठी छुपे कॅमेरे असलेल्या पेन, चष्मे, घड्याळे आणि शर्टाच्या बटनांचा वापर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.