सातारा : येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभागाकरिता यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीसाठी १३ कोटी ५० लाख. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाला आहे..सातारा मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्ण व्हावे आणि या कॉलेज व रुग्णालयातील सर्व विभाग पूर्ण क्षमतेने सुरु व्हावेत यासाठी ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु आहे.