सांगली : ‘मुलगा होत नाही व माहेरून पैसे आणत नाही’ या कारणांवरून पत्नीच्या डोक्यात बांबू मारून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पती कुमार भीमराव जाधव (वय ३८, रा. ब. मिरज) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. काकडे यांनी जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची व सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले..बामणोली येथील कुमार जाधव याचा विवाह सुनंदा (वय ३०) यांच्याशी झाला होता.