Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांसोबत बोलताना महाराष्ट्राच्या हास्यरेषा कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल भाष्य केलं आहे. पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत महाराष्ट्राच्या हास्यरेषा पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बंद खोलीत बैठक झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या.