Mugdha Deshmukh Death Case : उच्चशिक्षणासाठी लंडनला गेलेल्या छ. संभाजीनगरच्या मुग्धा देशमुख यांचा मृतदेह गहुंजे येथील बंद फ्लॅटमध्ये आढळला. कुटुंबापासून लपवून त्या ऑगस्टमध्येच भारतात परतल्या होत्या. Pimpri Chinchwad Crime : लंडन येथे उच्चशिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील 34 वर्षीय मुग्धा अविनाश देशमुख या तरुणीचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील 'लोढा बेलमोंडो' या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.