पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वाकडमध्ये एका मातेने तिच्यामुलासह 18 व्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. माणसाचं आयुष्य कधी कसं , कोणतं वळण घेईल हे सांगू शकत नाही. आज पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या वाकड येथे एका महिलेने तिच्या अवघ्या 6 वर्षांच्या मुलासह जीवनयात्रा संपवली.