नवी दिल्ली : एअर इंडिया आता स्वतःच्या वैमानिकांना प्रशिक्षण देणार आहे. कंपनीला महाराष्ट्रातील अमरावती येथील बेलोरा विमानतळावर उड्डाण प्रशिक्षण अकादमी सुरू करण्य. ३४ विमानांनी सुसज्ज असलेल्या या अकादमीचे उद्दिष्ट दरवर्षी अंदाजे १८० व्यावसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचे आहे. देशात एखाद्या भारतीय विमान कंपनीने स्थापन केलेली ही पहिली उड्डाण प्रशिक्षण अकादमी असेल. .एअर इंडियाने सांगितले की, बेलोरा विमानतळावर १० एकर जागेवर ही अकादमी उभारली जाईल. यामध्ये ३१ सिंगल-इंजिन आणि ३ ट्विन-इंजिन विमाने असतील.