#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics केदारनाथ धामसह जवळपासच्या हिमालयीन भागात गेल्या २४ तासांपासून पाऊस आणि हिमवृष्टी सुरू आहे. त्यामुळे मंदिर परिसर आणि डोंगररांगा बर्फाने झाकल्या असून धामचे दृश्य मनमोहक झाले आहे. तापमानात मोठी घट झाल्याने केदार खोऱ्यात कडाक्याची थंडी पडली आहे. यामुळे तेथील कर्मचारी, पोलीस आणि भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ११ नोव्हेंबरला भाऊबीजेच्या दिवशी बाबा केदारचे कपाट हिवाळ्यासाठी बंद होणार आहे. त्यानंतर उत्सव डोली उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात जाईल.