#Thane #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या पूर्णेकर समर्थकांवर कापूरबावडी पोलीस स्थानकात अत्याचार करण्यात आल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी काल दुपारी पूर्णेकर कुटुंबीयांची आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या पूर्णेकर समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी अर्जुन पुंदरे यांनी आपल्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.