Police Assault Dhuleधुळे : गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील आझादनगर परिसरात घड. आरोपीला ताब्यात घेत असतानाच त्याचे नातेवाईक आणि समर्थकांनी एकत्र येत पोलिसांना धक्काबुक्की व मारहाण केली. या झटापटीत पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले. विशेष म्हणजे, आरोपीने छातीत दुखत असल्याचा बहाणा केल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत जमावाने त्याला पोलिसांच्या ताब्यातून पळवून लावले.