पुणे : पुणे महापालिकेतील सुमारे १८ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या बोनसच्या रकमेत दरवर्ष. विशेष म्हणजे, या बोनसच्या रकमेत दरवर्षी २ हजार रुपयांची वाढ होणार असून, पाच वर्षांसाठी हा करार करण्यात येणार आहे. यंदा २७ हजार रुपये अतिरिक्त रक्कम मिळणार असून, २०२९-३० पर्यंत ती ३५ हजार रुपयांवर पोहोचेल.