Aundha Nagnath Short Circuit Fireऔंढा नागनाथ : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात शुक्रवारी (दि. ३०) सकाळी लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक झाली. सकाळी सातच. सकाळी सातच्या सुमारास एका दुकानातून धूर निघू लागल्यानंतर आगीची घटना उघडकीस आली. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. औंढा नागनाथ आणि हिंगोली येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी नऊच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले.