लखनौ : उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता मिळाल्यास भाजप राज्यात समान नागरी कायदा (युसीसी) लागू करेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार. याच वेळी त्यांनी राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधत, पुढील ३० वर्षे समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशात सत्तेत येणे शक्य होणार नाही, असे भाकीतही वर्तवले..भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना अमित शाह बोलत होते.