मधुकर पाटीलनिपाणी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेची शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मानकरी. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या या यात्रेत नाथांचे विविध धार्मिक विधी, ढोलवादन, वालंग, गजीनृत्य, बकरा खेळवणे आदी पारंपरिक कार्यक्रम पार पडले..बुधवारी पहाटे नाथांची पहिली व गुरुवारी पहाटे दुसरी भाकणूक ज्येष्ठ भाकणूककार भगवान डोणे महाराज (वाघापूरकर) यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी कथन केली; तर घुमट मंदिरात तिसरी व अखेरची भाकणूक भगवान डोणे महाराज.