सकाळ वृत्तसेवाठाणे, ता. ३० : महापालिका आणि परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त प्रत्येकी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुदानात ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून, महापालिकेतील आशा वर्कर्सनाही प्रत्येकी सहा हजाराची दिवाळी भेट मिळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी गुरुवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत केली..