न्यायालयाने म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात पोलीस कायद्याच्या कलम 33(1)(w) अंतर्गत आपल्या अधिकारांचे उल्लंघन करून एका कायदेशीर व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी घातली आहे, जे असंवैधानिक आहे. Somnath Temple: गुजरात उच्च न्यायालयाने सोमनाथ मंदिराच्या परिसरात मांसाहारी खाद्यपदार्थांच्या विक्रीवरील सरकारी बंदी रद्द केली आहे. न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची विनंतीही फेटाळून लावली. ठाकोर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सरकारचा युक्तिवाद फेटाळून लावत बंदी रद्द केली.