Worker Deaths Nagpurनागपूर : शहरातील गणेशपेठ परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.३०) घड. कॉटन मार्केट येथील गीता मंदिर परिसरातील म्हाडा कॉलनीत ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बांधकामस्थळांवरील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे..मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, म्हाडा कॉलनी परिसरात एका निर्माणाधीन इमारतीचे काम सुरू असताना अचानक क्रेन कोसळली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला.