३२ कोटींची मदत मिळणार;७,२०८ शेतकरी अॅग्रीस्टॅकच्या कचाट्यात! कळंब तालुक्यातील ६४ हजार ७९१ शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये; नोंदणी अपूर्ण असल्याने तीन कोटी ६० लाखांचे वाटप रखडण्याची शक्यता. कळंब तालुक्यात ३२ कोटींची अग्रीम मदत अपेक्षित कळंब, ता. ३० (बातमीदार) : दुष्काळाने खरीप हंगाम उद्ध्वस्त केला, आर्थिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि आता दिवाळीच्या तोंडावर जाहीर झालेल्या मदतीसाठी फार्मर आयडीचा अडसर निर्माण झाला आहे.