ठाणे, ता. ३० (बातमीदार) : दिवाळीच्या मंगलमय पर्वाची सुरुवात करणाऱ्या वसुबारस सणासाठी ठाण्यातील बाजारपेठा सज्ज झाल्या असून, गाय-वासरांच्या मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. वाढते शहरीकरण, गोठ्यांची घटती संख्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्यक्ष गाय-वासराची पूजा करण्याऐवजी अनेक घरांमध्ये मूर्तींची प्रतिष्ठापना करून पूजन करण्याची परंपरा रुजत आहे. त्यामुळे बाजारपेठेत मातीच्या आणि फायबरच्या मूर्तींना मागणी वाढताना दिसत आहे..दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण म्हणून देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.