सकाळ वृत्तसेवाठाणे, ता. ३० : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्रता, वारस नोंदणी आणि सदनिका वाटपाची माहिती मिळविण्यासाठी आता झोपडीधारकांना प्राधिकरणाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा सुरू केली असून, एका संदेशाद्वारे घरबसल्या ही माहिती मिळविता येणार आहे.प्राधिकरणाच्या ०२२-४१३५६८४० या दूरध्वनी क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवून नागरिकांना माहिती घेता येईल. यासाठी संबंधित झोपडीधारकाचे नाव आणि गृहनिर्माण संस्थेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.