सकाळ वृत्तसेवाठाणे, ता. ३० : मुंब्रा परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात मुंब्रा पोलिसांनी धडक मोहीम राबवत असताना, सम्राटनगर परिसरातून टांझानिया देशातील चार नागरिकांना अटक केली आहे. या छाप्यात तब्बल एक कोटी ५० लाख २७ हजारांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आला आहे. त्या चौघांना ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे शहर परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी (ता. ३०) ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.