फोर्टिसच्या डॉक्टरांचा इशारा.कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : मानेचा त्रास दूर करण्यासाठी अप्रशिक्षित व्यक्तीकडून जोर लावून मान मुरगळून घेणे आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. अशा प्रकारच्या उपचारानंतर दोन तरुणांना मेंदूचा स्ट्रोक झाल्याची दुर्मिळ प्रकरणे समोर आली आहेत. मानेच्या चुकीच्या हालचालींमुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना इजा होऊन स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा उपचारांपासून दूर राहून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन फोर्टिस हॉस्पिटल कल्याणच्या डॉक्टरांनी केले आहे..