मुंबई, ता. ३० : विविध उत्पादनांसाठी कॉम्प्रेस्ड एअर तयार करणाऱ्या कॉम्प्रेसरच्या श्रेणीतील नवे एबी सीरिजचे ऑइल फ्री स्क्रू एअर कॉम्प्रेसर, एलगी इक्विपमेंट्सतर्फे ड्रिंकटेक इंडिया २०२६ मध्ये सादर करण्यात आले..कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष भावेश करीया तसेच अध्यक्ष विकास तिरुवरुलू यांनी बुधवारी ही माहिती पत्रकारांना दिली. हे कॉम्प्रेसर अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणासाठी उत्तम असल्याचा कंपनीचा दावा आहे. कॉम्प्रेसर तयार करताना हा कॉम्प्रेसर पाणी व ऊर्जेचा आणि इतर संसाधनांचा चांगल्या प्रकारे वापर करतो.