IND vs NZ : श्रेयस अय्यर खूप नशिबवान कॅप्टन आहे. क्रिकेटच्या खेळात नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला लागते. सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 सीरीजमध्ये श्रेयसचं नशीब जोरात आहे. क्रिकेटमध्ये फक्त टॅलेंटच नाही तर नशिबाची साथ देखील तितकीच गरजेची असते. सध्या टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन श्रेयस अय्यरला नशिबाची चांगली साथ मिळतेय. श्रेयस अय्यरचे निर्णय अचूक ठरत आहेत. श्रेयस अय्यरने आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या चार टी20 सामन्यांमध्ये चारवेळा टॉस जिंकला आहे.