उत्तराखंडमधील जोशीमठजवळ छायी गावात बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या दुर्दैवी घटनेत पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते, मात्र तत्पूर्वीच सर्वांचा बळी गेला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेत पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी साधारणतः १ वाजून १२ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.