IND vs NZ : न्यूझीलंडने चौथ्या टी20 सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 259 धावासंख्या उभारली आहे. याच सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने तीन मोठे वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहेत. न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंहने एक खास टप्पा गाठला आहे. अर्शदीप सिंहने न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरची विकेट काढून टी20 इंटरनॅशनलमध्ये 150 विकेट पूर्ण केले. टी20 इंटरनॅशनलमध्ये 150 विकेट घेणारा अर्शदीप सिंह पहिला भारतीय आहे. अर्शदीप नंतर जसप्रीत बुमराहच्या नावावर 126 विकेट आहेत.