कालबाह्य म्हणजे एक्सापायर्ड झालेले अन्न पदार्थ बाजारामध्ये पुन्हा विक्रीसाठी आणण्यासारखे गंभीर प्रकार सुरु आहेत. राज्यातील या सर्व गुन्हेगारी क्रियांवर लगाम लावण्यासाठी आता एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांची आता काही खैर नाही. कालबाह्य झालेले आणि खराब झालेले अन्नपदार्थ नष्ट केल्याचे कागदोपत्री दाखवायचे आणि त्याच अन्नाची पुन्हा पॅकिंग करून बाजारात विक्री करायची, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.