Nashik News: नाशिक जिल्ह्याच्या शिक्षण विभागात सध्या लाचखोरी, बोगस शालार्थ आयडी आणि अवैध शिक्षक भरती प्रकरणांमुळे खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणांमध्ये तत्काली. या गंभीर प्रकरणांमध्ये तत्कालीन आणि आजी-माजी मिळून तब्बल नऊपेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चौकशीच्या फेऱ्यात आली आहेत. मात्र, या संपूर्ण प्रशासकीय गोंधळात अधिकारी कारवाईच्या फेऱ्यात अडकले असले, तरी त्याचा प्रत्यक्ष आणि नाहक फटका सामान्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे.