Jalgaon Accidentजळगाव: पाळधी ते तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलामुळे सुरू असलेली एकतर्फी वाहतूक आणि दीपनगरकडून येणाऱ्या बेदरकार, ओव्हरलोड राखाड डंपरच्या मनमानीने. २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील मकर फटाके गोदामासमोर हा भीषण अपघात घडला. .चुकीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ओव्हरलोड राखाड डंपरने धान्याने भरलेल्या ट्रकला समोरासमोर दिलेल्या जोरदार धडकेत ट्रकचालक जागीच ठार झाला. अपघात इतका अंगावर काटा आणणारा होता की दोन्ही वाहनांच्या केबिनचा चेंदामेंदा होऊन डंपर थेट मधल्या चाकापर्यंत आत दाबला गेला होता.