जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव–भुसावळ महामार्गावर नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर डंपर आणि गुजरातकडून नागपूरकडे जाणाऱ्या सोयाबीनच्या ट्रकमध्ये समोरासमोर भीषण धडक. या अपघातात रमेश चंद्र यादव (क्य ५६, रा. उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला, तर डंपरचालक मुक्तचर अली (रा. मध्य प्रदेश) गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे महामार्गावर सुमारे ३ तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.