जळगाव लाईव्ह न्यूज । अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि कलादर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता. कॉलेज परिसरातील कालिदास सभागृहात हा शास्त्रीय नृत्याचा भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमात शहरातील प्रख्यात नृत्यांगना डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार आणि त्यांच्या शिष्या कथक नृत्यातून विविध रूपांतील भगवान विष्णू यांच्या ९ अवतारांवर आधारित ‘अवतारम्’ ही संकल्पना रंगमंचावर साकारणार आहेत.