रामेश्वर विभूते सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी बन परिसरात असलेल्या सिद्धनाथ मंदिराशेजारी वाहणाऱ्या ओढ्याजवळ एक शिलालेख आढळला. हा जिल्ह्यातील पहिला इना. हा जिल्ह्यातील पहिला इनामी फर्मानयुक्त फरमान शिलालेख आहे, असे इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांचे म्हणणे आहे. .शिलालेखाच्या सुरुवातीस श्रीचे मंगलस्मरण करण्यात आले आहे. पुढे तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि महसूल प्रशासनातील संबंधित व्यक्तींनी एका विशिष्ट कारणास्तव मौजे शिरनांदगी जमीन व त्याबाबतचे उत्पन्न आणि इनामाचे हक्क प्रदान केल्याचा उल्लेख केला आहे.